शहराचा विकास साधण्यासाठी भाजपला निवडून द्या : मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : येत्या महिन्याभरात शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असा ठाम विश्वास राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल मकरिये, समीर राजूरकर,
कीर्ती शिंदे व सीमा साळवे यांच्या प्रचारार्थ साईबाबा मंदिर, खडकेश्वर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी खासदार भागवत कराड, हर्षवर्धन कराड, अमृता पालोदकर, राधाकिसन बनिया, सागर विसपुते, मुकेश जाधव, सिद्धार्थ साळवे, सचिन टिळक, दीपक पवार, मोहन कप्पा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील. विशेषतः पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल, तसेच परिसरातील वाईन शॉपमुळे नागरिकांना होत असलेला त्रास पुढील तीन महिन्यांत कायमस्वरूपी दूर करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. केंद्र व राज्य सरकारच्या लोकहिताच्या योजना घराघरात पोहोचवायच्या असतील आणि छत्रपती संभाजीनगरचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी नागरिकांना केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions